ऑडिओ बुक्स आणि श्राव्य माध्यमात आपला वेगळा ठसा उमटवणारे ‘स्नॉवेल’ आता आपल्यापुढे सादर करत आहे ‘चिंटुकल्या गोष्टी.’ ५ ते १२ वर्षं वयोगटातल्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा खजिना स्नॉवेल घेऊन येत आहे. या उपक्रमात स्नॉवेल बरोबर ‘चिंटू’ या अत्यंत लोकप्रिय चित्रमालिकेचे लेखक, चित्रकार चारुहास पंडित हे सहभागी होत आहेत. चिंटूच्या विश्वातल्या वेगवेगळ्या गोष्टी स्नॉवेलच्या श्रोत्यांना ‘चिंटुकल्या गोष्टी’ मध्ये ऐकायला मिळतील.  या categories ची नावंही कल्पकतेने डिझाईन केली आहेत. ‘कोणे एके काळी’, ‘खरंच का!’, ‘सूत उवाच’, ‘धप्पा कुट्टी’, ‘मिष्टी-डून’, ‘बेड टाईम स्टोरीज’, ‘ब्रश ब्रश स्टोरीज,’ ‘यार, नक्की कसं वागायचं?’ अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ‘चिंटुकल्या गोष्टी’ मध्ये ऐकायला मिळतील.

शोध चिंटूच्या आवाजाचा

चिंटूचे ऑडिशन स्क्रिप्ट:

“त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई पप्पांना सांगितलं तर ते म्हणाले, “एवढासा तर आहेस तू चिंटू, तुला कसलं आलंय टेन्शन!” आता यांना कसं समजावू मी, की किती टेन्शन्स असतात मला! मोठी माणसं अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून सतत मागे लागलेली असतात त्याचं टेन्शन! आईनी अचानक डब्यात पडवळाची भाजी दिली तर काय, याचं टेन्शन! मिनीनं तिची एखादी कविता ऐकवली तर काय, याचं टेन्शन! जोशीकाकूंच्या बागेतल्या कैऱ्या पळवण्याचं टेन्शन, नव्या खेळण्यासाठी पप्पांकडे हट्ट करण्याचं टेन्शन, राजूशी सतत होणाऱ्या भांडणांचं टेन्शन! परीक्षेचं, अभ्यासाचं, याचं, त्याचं…किती किती टेन्शन्स! बापरे! आणि म्हणे लहान मुलांना टेन्शन्स नसतात!

आम्हा लहान मुलांची मोठीमोठी टेन्शन्स मोठ्यांना कशी कळणार! जाऊदे, आता मीही याचा विचार करायचा सोडूनच देतो! त्यापेक्षा पप्पांकडे नवीन खेळणं कोणतं मागायचं याचा विचार करतो…idea! सतीश दादाच्या बाईक सारखी खेळण्यातली बाईक मला हवीच आहे किती दिवसांपासून. आता संध्याकाळी पप्पा आले की त्यांना सांगतोच! अरे बापरे, समोरून मिनी येतेय आणि तिच्या हातात कसलातरी कागद दिसतोय…नक्की कविता असणार! मी पळतोSSS”
————————————————————————————————————————————————

तुमची Audition ऑडिओ फाईल (mp3) फक्त
https://snovel.in/audition
वर शुक्रवार २१-मे-२०२१ रात्री ११:५९ पर्यंत upload करा.
Project Name – Chintoo

४-मे-२०२१ रोजी SNOVELच्या app आणि वेबसाईट वर चिंटुकल्या गोष्टी हा स्वतंत्र विभाग चालू होतोय.  लहान मुलांसाठी आजच्या काळातील गोष्टींचा एक प्लॅटफॉर्म या निमित्ताने खुला होत आहे. या प्लॅटफॉर्मवर येत्या काळात चिंटूच्या अजून काही गोष्टी आणि इतर अनेक धमाल गोष्टी समाविष्ट केल्या जातील.
चिंटूशी या उपक्रमाद्वारे जोडलं जाणं, ही SNOVEL आणि श्रोत्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. SNOVELच्या श्रोत्यांना हळू हळू  ‘चिंटुकल्या गोष्टीं’ द्वारे चिंटू आणि त्याच्या विश्वातल्या सगळ्या पात्रांना ऑडिओ माध्यमातून पहिल्यांदाच भेटता येईल. वर्तमानपत्रातली चित्रमालिका आणि चित्रपट या माध्यमांमधून घराघरांत लोकप्रिय असलेला चिंटू आता श्राव्य माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचेल.
SNOVEL सोबत यावेळच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही चिंटुकल्या गोष्टींचा खजिना unlock करता येईल!
आजच SNOVEL app डाऊनलोड करा, रजिस्टर करा आणि १ महिन्याचे सब्स्क्रिप्शन फ्री मिळवा !
अधिक माहिती साठी :
* Snovel Web: https://snovel.in/